🕒 1 min read
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था झाली नव्हती, हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कळताच त्यांनी त्यांचा राखीव सूट अमित शहा यांना दिला. अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संसकृतीचे दर्शन दिले. हे शरद पवारांचे संस्कार आहेत. असेही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
देशाचे गृहमंत्री @AmitShah यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट मा.अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत . हेच आहेत @PawarSpeaks साहेबांचे संस्कार @NCPspeaks
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 18, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १८ आणि १९ डिसेंबर या दोन दिवशीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. १८ रोजी त्यांनी शिर्डी येथील साई मंदीरात दर्शन घेतले. १९ रोजी ते पुण्यात येणार असून विविध विकास कामांच्या उद्घाटनासह सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपाने वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या तुलनेत अमित शहा यांचा फोटो मोठा छापण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ”सांगा मोठं कोण…? अमित शहा साहेब, की… छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.” असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
