Share

IND vs NZ | ‘या’ दिवशी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

Published On: 

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेमधील न्युझीलँडने पहिला सामना आपल्या नावावर केला असून दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. अशा परिस्थितीत भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या मालिकेमध्ये न्युझीलँड 1-0 ने आघाडीवर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 30 नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना खेळला जाणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तीन एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या मालिकेमध्ये न्युझीलँड संघ आघाडीवर असल्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ क्राइस्टचर्चला पोहोचले असून दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा एक दिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण चाहते Amazon Prime Video आणि DD Sports वर बघू शकतील.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तीन एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघामध्ये शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, उमरन मलिक, युजवेंद्रचहल या खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघातील रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही मालिका युवा खेळाडूंसाठी एक उत्तम संधी आहे.

तर, दुसरीकडे संघामध्ये केन विल्यमसन (सी), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (विकेटकीपर), अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!