Share

‘महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले आहे.ते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत.ज्या कामांच्या बाबतीत शंका येते, म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहेत. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे.

त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. दहा आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत. यावेळी महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल असेही ते म्हणाले आहेत.

हे सरकार लवकरच पडेल म्हणणाऱ्या भाजपला टोला लगावताना पवार म्हणाले,  ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है”

या वेळी अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!