मुंबई : आज साताऱ्यातील मल्हार पेठ येथील पोलीस स्टेशन आणि निवासी इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीच्या रंगसंगतीवरून नाराजी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य करताना खोचक टोला लगावला आहे.
‘अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसत. ते बघावं लागतं. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात. पण, हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे. लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघतो, त्याला काही अर्थ नाही. पण, एखादा रंग नाही, आवडला, तर ते बदलण्याचं धाडस सरकारमध्ये आहे,’ असं भाष्य उद्धव ठाकरेंनी केलं.
तर, त्यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला यावरून आता चर्चा सुरु आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या अंर्तगत वाद , त्यातच आक्रमक भाजप याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तोंड द्यावं लागत आहे.
काय म्हणाले होते अजित पवार ?
‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, त्यांच्या हस्ते इमारतींचं उद्घाटन व्हावं आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता यावं, असंच नियतीच्या मनात असावं. त्यामुळे पोलीस ठाण्याचं काम इतकं लांबलं. देर आये दुरूस्त आये. चांगल्या कामाची सुरूवात होतेय ही आनंदाची बाब आहे. ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजे. प्रेझेटेशनमध्ये इमारतीचा आणि पोलीस ठाण्याचा रंग मला आवडलेला नाही. पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. ते एकदम बेकार दिसतं. काम पूर्ण होईल त्यावेळस चांगल्या पद्धतीने रंग त्याला देऊ. चांगला रंग देऊन इमारत उठावदार करता येते. त्या गोष्टीचा विचार सगळ्यांनी करावा,’ असं अजित पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘५१८ चित्रपटांमध्ये काम करूनही मला ओळखल नाही’ ; डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीये’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- रंग बदलण्याबाबतचा टोमणा मुख्यमंत्र्यांनी नेमका कुणाला मारला ?
- ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

