Share

तिकीट का कापले हे विचारायला विनोद तावडे राज्यपालांच्या भेटीला, अजित पवारांनी केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यावर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटावर राज्यपालांनीच लक्ष घालावे अशी मागणी महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केली. या भेटीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , जयंत पाटील, छगन भुजबळ, शरद रणपिसे आदि नेते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याचा धडाका लावला आहे. आज भाजप नेते विनोद तावडे हे देखील राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी पोहचले होते. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या अगोदर विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली. ही भेट कशा संदर्भात असावी, याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.

पवार म्हणाले की, विनोद तावडे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाही. ते राज्यपालांना भेटून काय चर्चा केली हे माहित नाही. कदाचित विधानसभेला माझे तिकीट का कापले ? हे विचारयला कदचित ते राज्यपालांना भेटले असतील असा टोला अजित पवारांनी लगावला.

राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा , भातशेती , ऊस , सोयाबीन इ. प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने याबाबत लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी महाआघाडीच्यावतीने राज्यपालांना करण्यात आली आहे.

नुकसान झाल्याने द्राक्ष आणि संत्र्याच्या बागा मुळासकट उपटून शेतकऱ्यांनी फेकून दिल्या आहेत. द्राक्ष आणि संत्र्यांच्या झाडांना फळे येण्यासाठी तीन वर्ष वाट पहावी लागते. मात्र हाता तोंडाशी आलेला घास या निसर्गाने छीनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची खूप गरज आहे. विमा कंपन्याबाबत शेतकऱ्यांना विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे काळजीवाहू सरकारला काही बंधन असतात त्यासाठी महामहीम राज्यपालांनीचं शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे लक्ष द्यावे व योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी, अजित पवारांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191691960194519041?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191702189485346816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191714619338842112?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191716291209392128?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!