Share

#Budget : शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पट्रोल-डिझेल महागणार

Published On: 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करुन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पास विधानसभेत प्रवेश केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे.

तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला सुखावणारे काही निर्णय जाहीर करण्यात आले तर, काही निर्णयांवरून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!