🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार अज्ञातवासात आहेत.
अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला आहे. आपण आमदारकीचा राजीनामा देत आहोत, आणि त्याचा स्वीकार करावा, अशा एका ओळीत अजित पवारांनी हा राजीनामा दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कडे ई – मेल द्वारे अजित पवारांनी राजीनाम्याची प्रत पाठवली आहे. बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
याविषयी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. महाजन यांनी ‘अजित पवारांच्या राजीनाम्यामागे सध्या त्यांच्या पक्षात सुरु असणारा तणाव हे कारण असू शकतं किंवा कुटुंबातील अंतर्गत कलह हे सुद्धा कारण असू शकतं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पवारांच्या घरातील कौटुंबिक कलह पाहिला मिळाला. शरद पवारांना नातू पार्थ पवारसाठी एक पाऊल मागे यावं लागलं होतं असं विधान केले आहे
कारण संपूर्ण कुटूंब निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं होतं. शेवटी एकाच कुटुंबातील किती जण निवडणूक लढवणार? त्यामुळे पवारांनी माघार घेत पार्थला उमेदवारी दिली होती. कारण सध्याची युवापिढी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते असंही महाजन यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177575114226860035?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177574972144799744?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177572348448260096?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
