Share

अखेर ठरलं ! महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारच उपमुख्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तसेच त्यांनतर उपमुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सी खेच पाहायला मिळाली. मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. अखेेर मंत्रिमंडळचा विस्ताराचा मुहूर्त देखील ठरला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि उपमुख्यमंत्रिपदावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी आहे.

तसेच 23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. 30 डिसेंबरला हा मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्र्याच्या यादीचा घोळ अद्याप सुरू आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209319888117829633?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209326714045599744?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!