टीम महाराष्ट्र देशा : देशभर प्रसिद्ध असणाऱ्या आणि जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाचे अंदाज पत्र असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची हवा सध्या राज्यात सुरु झाली आहे. या महापालिकेत सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण आठ नगरसेवक आहेत. ही संख्या साठ वर जायला हवी, असे अजित पवार म्हणतात.त्या अजित पवारांकडे जादूची कांडी आहे का ? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना चांगलेच धारेवर धरले आहे.
चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की , अजित पवार खुश असले की त्यांचे हात आभाळाला लागतात आणि अडचणीत असले की शांत बसतात.त्यामुळे सध्या त्यांनी केलेले वक्तव्य त्याचस्वरुपातले आहे.राज्यातील राजकीय स्थिती, आगामी वाटचाल यासंदर्भात भावी दिशा व धोरण ठरविण्यासाठी नाशिकच्या मोजक्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चंद्रकांत पाटील बंद दाराआड चर्चा केली. मात्र, या दौऱ्याकडे बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवली. त्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल नाही याची त्यांना जाणीव झाली.
यावेळी त्यांनी निधन झालेले विजय बिरारी व महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी निवडक कार्यकर्ते, पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर खरमरीत टीका केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

