मुंबई : ‘राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरु नका, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा,’ असं ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक 'गुढीपाडवा' या मंगलमय दिनाच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरू नये, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन करतो. pic.twitter.com/tbWCiPDscR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 25, 2020
तसेच पुढे अजित पवार म्हणाले, ’21 दिवस लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं! कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू नये! संसर्ग कुटुंबियांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
‘नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्यावेळी वाहतूक सेवाही उपलब्ध करून दिली जाईल. कृपया, मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन जनतेनं करावं. त्यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद द्यावा, अशी कळकळीची विनंती देखील अजित पवारांनी जनतेला केलं आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.


