टीम महारष्ट्र देशा : राज्याच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. अनपेक्षितरित्या भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांचा पाठींबा घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एवढ्यावरच थांबले नसून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
या धक्कादायक घडामोडीनंतर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना धक्का बसला आहे. तर शिवसेना खा. संजय राऊत यांनी अजित पवारांना जनता माफ करणार नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि अजित पवारांच्या धक्कादायक कृत्यावर भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, अजित पवार काल रात्री 9 वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. पण ते संपूर्ण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवून बोलले नाहीत. त्यांची देहबोली आमच्या लक्षात आली होती. त्यानंतर ते बैठकीतून बाहेर पडले, आणि वकिलाकडे बसल्याचे सांगितले. आता सकाळी कळाले ते कोणत्या वकीलाकडे बसले होते.
तसेच अजित पावरांनी घेतलेल्या निर्णयाबाबत शरद पवार हे पूर्णपणे अभिज्ञ आहेत. त्यांना याबाबत काहीही माहित नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो, असे संजय राऊत म्हणाले. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले आहे. महाराजांच्या नावाला काळीमा फासला आहे. राज्यातील जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज भेटणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषदही घेऊ शकतात, असेही राऊत म्हणाले. दरम्यान कालपर्यंत राज्यात महाविकासआघाडीची चर्चा होती. कालच्या संयुक्त बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा झाली. मात्र आज सकाळी राजकीय भूकंप होतं अजित पवार आणि भाजपने एकत्र येत महाविकासआघाडीचा डाव उलथवून लावला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1198105755867418629?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1198105367076626432?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1198101617775501312?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

