Share

इच्छा नसताना बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातोय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध विकास्कामंवर भाष्य केलं. इच्छा नसताना सव्वा लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

यावेळी बोलताना ते म्हणले, ‘ महाराष्ट्राची इच्छा नसताना सव्वा लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राला त्याचा काय फायदा आहे? आपण याबाबत पुर्नविचार करतो आहोत. बुलेट ट्रेनचं काम पुढं गेलं तर हा खर्च दीड लाख कोटींपर्यंत होईल, असं सांगितलं जात आहे. हा खर्च महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ते पुढे म्हणाले, ‘ बीकेसीच्या भुखंडावर स्थानक करायचं आहे, म्हणून जागा द्यावी लागत आहे. हे मुंबई महानगरचं नुकसान आहे, त्यामुळं ते आपल्याला परवडणारं नाही. आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर जसं आपल्या विचाराचं सरकार आलं आहे, तशी आपली महानगरपालिका आली पाहिजे. महापालिकेत महाविकासआघाडीचे नगरसेवक निवडूण आणण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले, मध्यंतरी पाच वर्षे राज्यात भाजापाचं सरकार होतं. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईतील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विकासाला खीळ बसली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!