Share

अजित पवार आणि माझ्यात उपमुख्यमंत्री पदावरून कोणतीही स्पर्धा नाही : जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून मतभेद असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचं म्हंटल जात आहे. मात्र याबाबत जयंत पाटील प्रतिक्रिया दिले आहे. अजित पवार आणि माझ्यात कोणतीही शर्यत अथवा स्पर्धा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘लोकमत’शी बोलताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्यात कसलाही वाद नाही. आमचे अंडरस्टँडींग चांगले आहे. आमची एकमेकांशी स्पर्धा होऊ शकत नाही. आमच्या दोघांच्या मनात काय आहे, यापेक्षा शरद पवार यांच्या मनात काय आहे याला आमच्या पक्षात जास्त महत्त्व आहे. त्यानुसारच ते जे ठरवतील तेच होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान राज्यात अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगेस आणि शिवसेनेने एकत्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. मात्र या सरकारमध्ये अनेक पक्ष एकत्र आल्याने सत्तावाटप आणि जबाबदाऱ्यांचे वाटप कसे करावे याबाबत अद्याप चर्चा सुरु होत असल्याचं दिसत आहे. आजपासून हिवाळी अधिवेशनेला सुरवात होत आहे. तर हे अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं ठाकरे सरकरकडून सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1206428306888773637?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206423331894775808?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206422743878553600?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!