Share

स्टिव्ह स्मिथची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी, अजिंक्य रहाणे नवा कर्णधार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सनं ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेची आपल्या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.राजस्थान रॉयल्सच्या, Cricket Operations विभागाचे प्रमुख झुबीन बरुचा यांनी स्मिथच्या पायउतार होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्मिथच्या अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेऱ्यानं रंगेहाथ पकडलं आहे. या अखिलाडू कृतीस एकटा बॅनक्रॉफ्ट दोषी नसून, त्या कृतीमागे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वगटाचा निर्णय असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं दिली होती. त्यानंतर आयसीसीनं स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी आणि मानधनाच्या शंभर टक्के रकमेचा दंड अशी कारवाई केली होती.आता राजस्थान रॉयल्सनंही स्मिथची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्मिथने अखेर काल कर्णधार पद सोडलं आहे . संघाचा कर्णधार म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत स्मिथने कर्णधारपद सोडलं आहे. डेविड वॉर्नरनेही आपल्या उप कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरुन बॅनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.

काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.

स्मिथची कबुली –

चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला. तीस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमे-यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं. पण थोड्यावेळातच ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. त्यानंतर काही वेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे.

पहा व्हिडीओ 

https://twitter.com/CChroniclesHub/status/977597859771179008

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!