🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : पहिल्या चार कसोटींत अजिंक्य रहाणेच्या फारशा धावा झाल्या नव्हत्या. त्यानंतर परदेशातील खडतर दौऱयावर जाण्यापूर्वी त्याचा प्रशिक्षक म्हणून त्याच्याकडून मी मेहनत करून घेतली होती.
प्रशिक्षकाचे ऐकणारा गुणी क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे. तो खूप मेहनत करतो. म्हणून 36 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर मेलबर्नवर कमबॅक करत संघाला विजय मिळवून देण्यात त्याची मेहनत प्रकर्षाने दिसून आली, अशा शब्दांत अजिंक्य रहाणे या मुंबईकर पठ्ठय़ाचे त्याचे प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांनी कौतुक केले आहे.
अॅडलेड कसोटीत मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाचा काटेरी मुपुट परिधान केलेल्या अजिंक्य रहाणे याने शानदार शतकाबरोबरच हिंदुस्थानला कसोटी विजय मिळवून देताच त्याच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला. गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली भारताने प्रथम बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने २०२०मधील अखेरी लढत जिंकली आणि चाहत्यांना ३१ डिसेंबरची भेट दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ईडीचा वाद चिघळला : शिवसैनिक रस्त्यावर उतरणार?
- ‘धोनीचं टी 20 मध्ये काहीच योगदान नाही ‘या ‘खेळाडूची जहरी टीका
- नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा नामांतराला विरोधच – अशोक चव्हाण
- आजचे स्टार्टअप्सचं उद्याच्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी बनतील – नरेंद्र मोदी
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
