मुंबई : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शेती प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. शेती प्रकल्पात गुंतवणूक करणारा तो पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. महिंद्रा ग्रुपच्या ‘मेरा किसान’ या कंपनीत त्याने मोठी गुंतवणूक केली आहे.भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रहाणेनं सोशल मीडियावरून ही घोषणा केली.
भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेनं महिंद्रा ग्रुपच्या ‘मेरा किसान’ या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यानं मेरा किसान या कंपनीचा काही हिस्सा विकत घेतला आहे. शिवाय तो या कंपनीचा सदिच्छादूतही आहे.
२०१६ मध्ये किसान प्रायव्हेट नावाची कंपनीची स्थापना झाली आहे. सेंद्रिय पदार्थांच्या संबंधित ही कंपनी काम करते. महिंद्रा अँग्री सोल्यूशनचे व्यवस्थापकिय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा यांनी सांगितले की,”रहाणेनं या कंपनीचे काही शेअर विकत घेतले आहेत. पण, त्यांनी नेमकी किती गुंतवणूक हा आकडा सांगितला नाही.
दरम्यान, सेंद्रिय पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फार चांगले आहेत. एकसमान ध्येयाने मी आणि कंपनी काम करणार असून यामधून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मला हातभार लावता येईल, अशा भावना रहाणेने यावेळी व्यक्त केल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

