ऑस्ट्रेलिया : भारताचा हिटमॅन रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांसाठी मेलबर्नमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. रोहित संघात दाखल होताच सहकारी खेळाडूंनी टाळ्या वाजवून ‘हिटमन’चं स्वागत केलं. दुखापतीमुळे रोहित शर्माला सुरुवातीच्या वन-डे व टी-२० सामन्यांमध्ये सहभागी होता आलं नाही.
तर, दुखापतीमधून सावरल्यानंतर तंदुरुस्त झालेला रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला. कोरोनाच्या अटी, विलग्नवास पूर्ण केल्यानंतर अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी हिटमॅन सज्ज झाला आहे. तो सरावासाठी दाखल झाला असून महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली हा पालकत्व रजेवर भारतात परतला आहे.
त्यामुळे, कर्णधारपद मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अजिंक्यच्या नेतृत्वात भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन विजय मिळवला. आता तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असून उपकर्णधारपद हे महाराष्ट्राच्याच रोहित शर्माला देण्यात आलं आहे. त्यामुळे, आता भारतीय संघाची धुरा महाराष्ट्राकडे आल्याने ही आनंदाची बातमी असून येत्या कसोटीत देखील ऑस्ट्रेलियाला हरवून भारताचा विजयी पताका कायम राहील अशी अपेक्षा चाहते करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
- भारत-युकेमधील विमानसेवा पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारचा निर्णय
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- ‘भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी आता चाळ कमिटीच्या निवडणुकीतही उतरावं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

