अहमदाबाद : देशात कोरोनाने थैमान घातले असताना प्रत्यके नागरिकाला आज काहीशी धास्ती बसली आहे. त्यामुळे काही सुजाण नागरिक स्वतःहून कोरोनाची टेस्ट करून घेत आहेत. मात्र अशाच टेस्टच्या फेऱ्यात अहमदाबाद मधील एक व्यवसायिक अडकला आहे. तर त्याचे येणारे अहवाल हे संभ्रमित करणारे असल्याने गेले २२ दिवस तो रुग्णालयात अडकून पडला आहे.
याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. त्या असे म्हंटले आहे की, कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अहमदाबाद शहरातील एक व्यवसायिक मागच्या २२ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. पण या दरम्यान त्यांच्यामध्ये कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. कोरोना च्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, श्वासोश्वास करताना त्रास अशी लक्षणे आढळून येतात. पण त्यांच्यामध्ये कोरोनाची दुर्मिळ सोडा पण सामान्य लक्षणेही आढळलेली नाहीत.
हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त व्हिटॅमिन सी ची औषधे देण्यात येत आहेत. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट सतत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येत असल्यामुळे इतक्या दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत. २९ मार्चला सर्वप्रथम त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले.
त्यांच्या आतापर्यंत कोरोनाच्या एकूण सहा चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असा आला आहे. १९ एप्रिलला पुन्हा त्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
याबाबत व्यावसायिकाने म्हंटले की, मी १४ मार्चला दुबईला गेलो होतो. १७ मार्चला परत आलो. २१ मार्चला मी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले. माझ्यात करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. खासगी प्रयोगशाळेमध्ये करोनाच्या चाचण्या होत असल्याचे समजल्यानंतर जबाबदार नागरिक म्हणून मी माझी चाचणी करुन घेतली. त्याता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

