मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. आता, भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. खडसेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळालं होतं. तर, आता गायकवाडांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जम बसवण्याच्या तयारीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”
- वीज बिल माफी न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा बावनकुळे यांचा इशारा
- ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी


