Share

काबूलमधून मायदेशी सुखरुपपणे परत आल्यावर नागरिकांनी मानले केंद्र सरकारचे जाहीरपणे आभार

Published On: 

🕒 1 min read

 नवी दिल्ली- तालिबानने अफिगाणिस्तानवर कब्जा करत आपला झेंडा फडकावला आहे. तालिबानने स्वत:ला अफिगाणिस्तानचे नवे सरकार म्हणून घोषित केलं आहे. अफगाणिस्तानात गंभीर परिस्थिती बनल्यानंतर अनेकांनी त्या देशातून काढता पाय घेतला आहे.

काबूलमधील भारतीय मिशनच्या 192 कर्मचाऱ्यांना तीन दिवसांमध्ये दोन टप्प्यांमध्ये सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलं आहे. मिशनद्वारे अनेक संकटग्रस्त भारतियांना मदत करण्यात आली आणि त्यांना आश्रय देण्यात आला. जामनगर इथं या नागरिकांचं स्वागत करण्यात आलं.दरम्यान, काबूलच्या भारतीय दूतावासातून सोमवारी ४० कर्मचाऱ्यांना भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून मायदेशी आणण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात या दूतावासातील राजनैतिक अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधींसह १५० जणांना मंगळवारी सुखरूप भारतात आणण्यात आले. देशात सुखरुपपणे परत आल्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच केंद्र सरकारचे जाहीरपणे आभार देखील मानले आहेत.

दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. अफगानिस्तानमधील सध्याच्या अस्थिर परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. अफगानिस्तानमधली परिस्थिती बघता काबुलमधील दूतावासातील कर्मचारी, अधिकारी आणि अन्य नागरिकांसह 150 जणांना घेऊन येणारं हवाई दलाचं सी-17 विमान काल संध्याकाळी दिल्ली जवळच्या हिंडन हवाई तळावर दाखल झालं. तत्पूर्वी हे विमान प्रथम गुजरातमध्ये जामनगर इथं उतरलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!