Share

झारखंडच्या जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो – अमित शाह

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : अमित शहा यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडच्या जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, असं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले. आम्हाला 5 वर्षं काम करण्याची संधी दिल्याबद्दल इथल्या जनतेचे आभार मानतो. राज्यातील विकास कायम राहावा, यासाठी भाजप बांधील आहे, असंही ते म्हणाले.

तसेच झारखंडच्या विधानसभा निवडणुकीतील ८१ जागांवर स्वबळावर रिंगणात उतरलेल्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अबकी बार ६५ पारचा त्यांचा नारा अपयशी ठरला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पाचव्या राज्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

याचप्रमाणे ‘आम्हाला अनेक वर्षं सेवेची संधी दिल्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे आभार मानतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली, त्यांचेही आभार मानतो. आम्ही यापुढेही राज्याची सेवा करत राहू आणि वेळोवेळी लोकांचे प्रश्न उठवत राहू," असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दरम्यान, जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांच्यासह झारखंडमधील विजयी आघाडी सरकारचे मोदींनी ट्विटरच्या अभिनंदन केले. ‘निवडणुकीतील विजयासाठी हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या आघाडीचं अभिनंदन. पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा, असंही PM मोदी पुढे म्हणाले. आगामी काळात आम्ही राज्यातील सेवा आणि केंद्रातील मुद्यावर झारखंडला न्याय देण्यास कटिबद्ध राहू, असा उल्लेख देखील नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209312038968684545?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209317729917816839?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!