Share

काकडेंचा कॉंग्रेस प्रवेश मात्र आयात उमेदवारावर पृथ्वीराजबाबांचं मौन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्याच्या लोकसभेच्या जागेच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच रस्सीखेच पहायला मिळत होती. राष्ट्रवादीने पुण्याची जागा कॉंग्रेसला सोडली असली तरी पुण्यातील खासदार आपल्याच मर्जीतील असावा असे प्रयत्न राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून कॉंग्रेसमधून मात्र काकडे यांच्या नावाला विरोध केला जात आहे.

शहर पातळीवरील नेत्यांशी बोलून, त्यांच्या म्हणण्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे दिल्याचे, सोमवारी चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच उमेदवारीबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगितले. परंतु उमेदवार हा पक्षातील असेल की बाहेरून आयात केलेला असेल, याबाबत मात्र काही सांगण्याला त्यांनी नकार दिला.

दरम्यान,भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार संजय काकडे यांनीच संदर्भात माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते. यावेळी बोलताना काकडे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, आज पक्षाचे काही निरीक्षक पुण्यात येणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे निरीक्षक पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे निरीक्षक त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देतील असं समजतंय. दरम्यान उद्या मुंबईत कॉंग्रेसकडून अधिकृतरीत्या खा. संजय काकडे यांच्याचं नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!