टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड राज्यातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. ‘अबकी बार ६५ पार’ अशी घोषणा भाजपला निम्म्या जागाही मिळविता आल्या नाहीत. दिल्लीत भाजपची सत्ता सत्ता असूनही इअतर राज्यातील जनता भाजपला नाकारत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले, मागील पाच वर्षांत झारखंडमध्ये गरिबीचे प्रमाण वाढले असून जवळपास ४६टक्के जनता अद्यापही दारिद्र्यरेषेखाली आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण २८ टक्के आहे. झारखंडमधील बेरोजगारीने कळस गाठला आहे. तर झार्खान्द्मधील औद्योगिक आणि सेवा क्षेत्र ठप्प झाल्यामुळे बेरोजगारीचा दर २०.४% झाला आहे. मात्र भाजपने निवडणूक सभेत कोणताही ठोस कार्यक्रम दिला नव्हता, असेही चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळेच ‘महाराष्ट्र गुजरातपासून सुरू झालेला हा ट्रेंड आता झारखंड सारख्या राज्यातही दिसून आला. आता झारखंड मध्येही झारखंड मुक्ती मोर्चा, लालूप्रसाद यादवांचा राजद, काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी सरकार स्थापन करेल.
दरम्यान, नऊ सभा घेऊन काय फायदा झाला असा प्रश्नी चव्हाण यांनी यावेळी विचारला. झारखंडमध्ये नरेंद्र मोदींनी ८ ते ९ तर अमित शहा यांनी १६ ते १७ सभा घेऊनही भाजपला याचा काहीही फायदा झाला नाही. त्या तुलनेत काँग्रेसने फारशी ताकद न लावताही या राज्यातील जनतेने भाजपला नाकारले. हेच चित्र महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि आता झारखंड मध्येही पाहायला मिळाले. आता येणाऱ्या बिहार व दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातही भाजपला बहुमत मिळेल की नाही याबाबत शंका आहे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1209326714045599744?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209355340233359360?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

