मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. आता अशीच तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून देखील येत असल्याची बातमी समोर आली आहे.
तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, बच्चू कडूंचे सक्त आदेश
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधी निर्णय प्रक्रियेत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे.
अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट
राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. लवकरच पवार-ठाकरे या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.


