Share

संदीप जोशींनंतर आता नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी कोरोनाच्या विळख्यात!

Published On: 

नागपूर:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तशी माहिती वंजारी यांनी स्वत: दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी समाज माध्यमांतून दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकेकाळी प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा भाजप उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीनं एकत्रितपणे ही निवडणूक लढत भाजपला मोठा धक्का दिला आहे. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर महापौर संदीप जोशी यांना देखील कोरोनाने गाठले आहे. संदीप जोशी यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. जोशींनी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर संदीप जोशी महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!