Share

रोनाल्डोनंतर ‘या’ एका स्टार खेळाडूने बियरची बाटली हटवली

Published On: 

मुंबई : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि या कृतीचा फटका कोका कोला कंपनीला बसला आणि कंपनीचे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही बातमी ताजी असतानाच एका फुटबॉलपटुने अशीच काही कृती केली आहे.

मंगळवारी १५ जुन रोजी फ्रान्सचा मिडफील्डर पॉल पोग्बा हा पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याच्यासमोर असलेल्या टेबलवर एक बियरची बाटली होती. यावेळी पॉलने पत्रकार परिषद सुरु होण्यापुर्वी समोर ठेवलेली बियरची उचलुन खाली ठेवली आणि पाण्याची मागणी केली. मात्र यासंदर्भात काहीही वक्तव्य बोलण्यास पॉलने नकार दिला. मात्र यादरम्यान पॉलने कोका कोलाच्या बाटल्या टेबलावर तशाच राहु दिल्या.

त्याच्या या कृतीमुळे उपस्थीत सर्व पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. पॉलने जी बियरची बाटली हटवली होती ती हेईनकेन या कंपनीची होती. हेईनकेन युरो कपचे ऑफिशियल प्रायोजक आहे. कोका कोलाच्या दोन बाटल्या रोनाल्डोने हटवल्यानंतर कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. २८ वर्षीय पॉल हा फ्रान्सकडुन खेळत असतो. तसेच तो इस्लाम धर्माचे पालन करतो.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!