Share

अखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे. यासोबतच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई देखील करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. लाखो मुंबईकरांना या संपाचा फटका बसत असल्याने संप त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने संप तासाभरात मागे घ्यावा आणि संप मागे घेतल्याची घोषणा करा असा आदेश दिला. त्या सोबतच वेतनश्रेणीतील जो फरक होता तो सोडवला जाणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांत चर्चाकरून प्रश्न सोडवण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!