Share

Eknath Shinde Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “दिघे साहेबांच्या आठवणी…”

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासभर चालली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. त्यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे.

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “राज्यात उत्सावाच आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणरायाचं दर्शन घेतलं बाकी काहीच चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही एक सदिच्छा भेट होती. आमची राजकीय चर्चा झालीच नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला-

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला का?, या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, दिघे साहेबांच्या आठवणी चर्चेमधून निघाल्या जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सानिध्यात काम केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर काम केले.

सत्तातरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेटीला-

राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झालं आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले. त्यामुळे या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राज्यातील सत्ताबदलनानंतर मनसे आणि भाजपा युतीची चर्चा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहेत. त्यात नुकताच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!