Share

Arvind Kejriwal | दिल्लीत CBI छाप्यामुळे गुजरातमध्ये ‘आप’च्या मतांची टक्केवारी वाढली ; केजरीवालांचा दावा

Published On: 

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्ली विधानसभेत मोठा दावा केला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) मतांची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत सांगितले.

यादरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, खोटे प्रकरण करून भाजपला काय मिळते? तुम्ही देशाचा वेळ वाया घालवत आहात. मनीष सिसोदिया यांच्यावर छापा टाकल्यापासून गुजरातमध्ये आमची मतांची टक्केवारी ४ टक्क्यांनी वाढली आहे, अटक केली तर ६ टक्के मते आणखी वाढतील.

अटक करण्यासाठी दबाव-

केजरीवाल यांनी दावा केला, “सीबीआयने सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला, त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या बँक लॉकरची झडती घेतली. सीबीआयचे लोक म्हणतात की त्यांना सिसोदिया यांच्या विरोधात काहीही सापडले नाही परंतु त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे.”

भाजप नेत्यांनी आप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला-

भारतीय जनता पक्षाची (भाजप) खिल्ली उडवत मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप नेत्यांनी आप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या एकाही आमदाराने त्यांची ऑफर स्वीकारली नाही. केजरीवाल म्हणाले, “संपूर्णपणे भ्रष्ट पक्षात शिक्षित लोकांची कमतरता आहे, तर ‘कट्टर प्रामाणिक’ पक्षात सुशिक्षित, आयआयटी पदवीधारक आहेत.”

सीएम केजरीवाल म्हणाले की, ते आमदारांना विकत घेण्यासाठी भाजप 20-50 कोटी खर्च करत आहेत. मात्र मला शाळा आणि रुग्णालये बांधायची असतील तर मी काही चुकीचे करत आहे का? दिल्लीतील भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ अयशस्वी झाल्याचे सांगण्यासाठी आप सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला, यावेळी केजरीवाल बोलत होते.

महत्वाच्या बातम्या –
 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!