Share

मराठा आरक्षण ; न्यायालयाच्या निर्णयाचे परभणीत आतिशबाजीत स्वागत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील निकालाने संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान परभणीत न्यायालयाच्या निर्णयाचा फटके फोडत जल्लोष करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे, परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले.

दरम्यान न्यायालयाच्या या निकालावरून मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यात मराठा समाजाकडून न्यायालयाच्या या निर्णयाचा जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर परभणी कारांकडून मराठा आरक्षणासंदर्भातिल न्यायालयाच्या निर्णयावर जल्लोष करण्यात आला. फटके, आतिषबाजी करत न्यायालयाच्या निर्णयाचा जल्लोष करण्यात आला.

यावेळी अजय गव्हाणे, रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर, गजानन लव्हाळे, अरुण पवार, गंगाधर जवंजाळ, किशोर रनेर, विठ्ठल धस, आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!