टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादेत शिवसेनेच्या बालेकील्याला वंचित बहुजन आघाडीने सुरंग पाडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे. पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. निकालात औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला. पराभवानंतर खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्याम्नात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, निकालादरम्यान औरंगाबादमध्ये वंचित आणि एमाआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, आमच्या गाड्या फोडल्या, तसेच जागो जागी हिरवा गुलाल उधळल्या गेला. असे खैरे यांनी म्हंटले
इतकेच नव्हे तर, महिलांना त्रास दिला. असा आरोपही त्यांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
