🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काॅंग्रेसमधून आम्ही अनेक मंडळी बाहेर पडलो. मी पण विखे पाटलांबरोबर त्या रस्त्याने निघालो होतो. साधारण पंधरा दिवस चाललो. पण रस्त्यातूनच मागे फिरलो.
नंतर मी ज्या रस्त्याने गेलो, तो रस्ता आंब्याच्या झाडाखाली गेला, अन विखे पाटील ज्या रस्त्याने गेले, तो बाभळीच्या झाडाखाली जाऊन थांबला. आता विखे पाटलांनी आंब्याच्या झाडाखाली यावे, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना केले आहे.
राज्यात शिवसेना व भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरु असताना तसेच पदवीधर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना सत्तार यांनी विखेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
विखे-सत्तार दोघेही वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात खास मैत्री होती. मात्र दरम्यानच्या काळात काही गणिते बदलली आणि सत्तारांनी सेनेत प्रवेश केला तर विखेंनी भाजपमध्ये. दोघांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी दोन दिवसांपूर्वी सत्तारांनी विखेंची भेट घेऊन मैत्री शाबूत ठेवली आहे.
विखे कुटुंबीय यापूर्वी शिवसेनेत होते. त्यांची शिवसेनेशी नाळ जोडलेले आहे, परंतु ती घट्ट होऊ शकली नाही. विखे पाटील यांनी सत्तार यांच्या निमंत्रणावर भाष्य करण्याचे टाळले. परंतु तुम्हीच आमच्याकडे या, असेही म्हटले नाही.
याचाच अर्थ विखे पाटील शिवसेनेत जाण्याबाबत सकारात्मक आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप खिळखिळी करण्याचा शिवसेनेचा हा डाव आहे का?, विखे पाटील यांना रोखण्यासाठी भाजपश्रेष्ठी प्रयत्न करतील काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- प्रताप सरनाईकंच्या घरावर ईडीचा छापा,फडणवीस म्हणाले…
- ‘…नाहीतर जयंत पाटलांची सुट्टी केली असती’; राजकारणातील दोन पाटील आमने-सामने
- सरनाईक अर्नब विरुद्ध बोलले तेव्हाच अंदाज आला होता आता यांच्यावर कारवाई होणार – भुजबळ
- ‘यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार’, संजय राऊतांचा दानवेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
