Share

प्रताप सरनाईकंच्या घरावर ईडीचा छापा,फडणवीस म्हणाले…

Published On: 

मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

सोलापुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!