Share

कोरोना गो…नंतर आता ‘महाविकास आघाडी गो…’ रामदास आठवले आता नवीन मिशनवर

Published On: 

मुंबई : केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हणत आहेत. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना… कोरोना गो… असे म्हणताना आपण पाहिलं. आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला. मात्र, जोपर्यं कोरोना जात नाही, तोपर्यंत मी गो कोरोना… म्हणतच राहणार असे आठवेलंनी म्हटले आहे.

यामध्ये आता रामदास आठवलेंनी नव्याने भर टाकले आहे, गो कोरोना… कोरोना गो… असे म्हणत कोरोनाला भारतातून घालवणार असल्याचं म्हटलं होतं. आता, गो कोरोनासारखेच महाविकास आघाडी गो म्हणत महाविकास आघाडीला घालवणार असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.

आठवले यांनी आज राज्यसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, ते माध्यमांशी संवाद साधत होते.यावेळी ते म्हणाले की, मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. पण, त्याची काळजी घेणं, ही आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे, आपल्या गावात, आपल्यामध्ये आला नाही पाहिजे, यासाठीही काळजी आपण घेतली पाहिजे, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत कोरोन गो, कोरोना गो…असं म्हणतच राहणार आहे. कोरोना गो म्हणत म्हणत महाविकास आघाडी गो… असंही आम्हाला म्हणावं लागेल, असे म्हणत रामदास आठवलेंनी राजकीय टोलाही लगावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!