Share

‘गब्बर’ पाठोपाठ ‘अजिंक्य रहाणे’ने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवनने कोरोनाची लस टोचवुन घेतली आणि इतरानाही अवाहन केले होते की लवकरात लवकर लस घ्या. धवननंतर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने कोरोना लस टोचवून घेतली. अजिंक्यने लस घेतानाचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये रहाणेने ‘मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, जर तुम्ही लस घेण्यासाठी पात्र असाल तर नोंदणी करुन लवकर लसीकरण करुन घ्या’ असे अवाहन केले आहे.

आयपीएल स्पर्धेत अजिंक्यला केवळ दोन सामन्यात संधी मिळाली होती. या दोन सामन्यात अजिंक्यने केवळ ८ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये रहाणेला जास्त संधी मिळत नाही. आयपीएल २०१२ मधील आयपीएल स्पर्धेत आजिंक्यने त्याची सर्वोत्तम कामगीरी केली होती. या स्पर्धेत अजिंक्यने ५६० धावा चोपल्या होत्या. यात त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!