Solar Eclipse टीम महाराष्ट्र देशा: 24 ऑक्टोबर 2022 रोजी देशात सर्वत्र दिवाळी (Diwali) साजरी केली जाणार आहे. तत्पूर्वी 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार असून सगळीकडे दीपोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर यावर्षी दिवाळीत एक अनोखी घटनाही घडणार आहे. तब्बल 27 वर्षानंतर यावर्षी दिवाळीनंतर सूर्यग्रहण अनुभवायला मिळणार आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण हा खगोलीय आविष्कार अनुभवायची संधी खगोलप्रेमींना मिळणार होणार आहे.
खगोलप्रेमींना यावर्षी एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण अनुभवायला मिळाले होते. दरम्यान, आता लवकरच त्यांच्यासाठी दुसरे आणि या वर्षातले अखेरचे सूर्यग्रहण पार पडणार आहे. दिवाळी संपल्यानंतर खगोलप्रेमींना दुसरे सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. हवामान खात्याकडून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगाळ वातावरण राहण्याची देखील संभावना आहे. या वातावरणामुळे सूर्यग्रहणास व्यत्यय निर्माण होऊ शकतो. पण जर अवकाश मोकळे राहिले तर 25 ऑक्टोबरला खगोलप्रेमींना खग्रास सूर्यग्रहण बघायला मिळेल.
जवळजवळ 27 वर्षानंतर दिवाळी दरम्यान या ग्रहणाचा मुहूर्त आला आहे. काही धर्मशास्त्रांच्या म्हणण्यानुसार, सामान्यता दिवाळीच्या पुढच्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते परंतु या वर्षी सूर्यग्रहणामुळे 25 ऑक्टोबर ऐवजी 26 ऑक्टोबरला गोवर्धनाची पूजा केली जाणार आहे.
सूर्यग्रहण सुरू असताना ‘ही’ काळजी घ्या
खगोलप्रेमी सह इतर लोकांनीही या सूर्यग्रहणाचा आनंद घेत असताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण्याचे टाळावे कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता वाढू शकते. चष्मा आणि गॉगल इत्यादी गोष्टींचा उपयोग करूनच सूर्यग्रहण बघावे.
भारतात पूर्वीपासूनच खगोलशास्त्राला धर्मशास्त्राशी जोडले गेलेले आहे त्यामुळे ग्रहण काळात काही संहितांचे पालन करण्याचा उल्लेख देखील केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने सुतक या भागाचा समावेश होतो. भारतात सूर्यग्रहण दुपारी 4 च्या सुमारास दिसणार असून बारा तास आधी म्हणजे पहाटे 4 पासून सुतक काळ सुरू होणार असून संध्याकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी संपणार आहे.
सूर्यग्रहणाचा या राशींवर होईल प्रभाव
ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीत आलेला हा सूर्यग्रहणाचा काळ तुळ राशीमध्ये होणार आहे. त्यादिवशी या राशीतील सूर्य दुर्लभ असल्याने त्याचे अशुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार, सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, सूर्य, शुक्र आणि केतू तूळ राशीत प्रवेश करतील. तूळ राशी बरोबर मिथुन आणि मकर राशीच्या लोकांवर देखील या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव राहील.
महत्वाच्या बातम्या
- Car Cleaning Tips | ‘या’ सफाई पद्दती वापरून नव्यासारखी चमकेल तुमची कार
- Abdul Sattar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का?, अब्दुल सत्तारांनी केलं स्पष्ट, म्हणाले…
- Ashish Shelar | वरळीच्या आमदाराचे पेग, पेंग्विन, पार्टी या पलिकडे काही नाही ; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला
- Dhananjay Munde | “भाजपने दहा जन्म घेतले तरी…”, रोहित पवारांनी ‘तो’ आरोप करताच धनंजय मुंडे देखील कडाडले
- Rajan Salvi | नितेश राणेंच्या दाव्याला राजन साळवींचे त्याच शब्दात प्रत्युत्तर! म्हणाले, “ये अंदर की बात है…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

