Share

निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने कडक शब्दात फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला आणखी एक धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकृत वकिल मोहित डी. राम यांनी पदाचा राजीनामा दिलाय. ते वर्ष २०१३ पासून निवडणूक आयोगाच्या वकिलांच्या पॅनलचे सदस्य होते. इतकेच नाही तर राम यांनी निवडणूक आयोगाच्या कामावरही टीका केली आहे.

मोहित डी. राम हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या पॅनलचे सदस्य आहेत. आयोगाच्या विधी विभागाच्या संचालकांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. या राजीनाम्यात त्यांनी निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कार्यशैलीवर टीका केलीय. आयोगाची कार्यशैली आणि माझी मूल्ये यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात होणारी गर्दी पाहता देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. तेव्हापासून निवडणूक आयोगावर टीका होत आहे. या विरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात देखील गेले होते मात्र, सर्वोच्च न्यायालयामध्येही आयोगाला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता निवडणूक आयोगाला हा दुसरा मोठा धक्का आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!