Share

प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब; याला म्हणतात ठाकरे सरकार!

Published On: 

सिंधुदुर्ग: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून कोकणातील आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करायला जात असतात. कित्येक महिने अगोदर विशेष रेल्वेगाड्या व एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल होत असते. यंदा, गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट गडद झाले आहे.

राज्य सरकारने कोणतीही सोय वा स्पष्टता न केल्याने, कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता यासंदर्भात ट्विट करत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. ” आज ४ ऑगस्ट उजाडला तरी महाराष्ट्र सरकार गणेश चतुर्थी साठी कोकणात जाणाऱ्या जनतेसाठी काहीच बोलत नाही आहे? , असा सवाल विचारत त्यांनी सामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागत असलेल्या परिस्थितीचं वर्णन देखील केलं आहे.

मूलनिवासी आदिवासींच्या रास्त मागण्यांना कायद्यांच्या कचाट्यात अडकवू नका – विजय वडेट्टीवार

ते म्हणतात, ‘ वाऱ्यावर सोडले आहे… ई-पास च्या नावाने लुट सुरु आहे..गावात गोंधळ सुरु आहे..प्रशासन ठप्प! पालकमंत्री गायब!! याला म्हणतात ठाकरे सरकार !”  अशा शब्दांत ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहरात ७ ऑगस्ट पासून पुन्हा लॉकडाऊन

दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील, ‘कोकणात जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतोय. राज्य सरकारने ई-पास चं नाटक बंद करावं, काही गरज नाही पास वास ची. दलालांना पोसण्यासाठी पास ठेवलाय काय??? क्वाॅरंटाईन किती दिवसाचा असेल हे पण सरकारने अजून सांगितलेलं नाही. कोकणी माणूस मागच्या ४ महिन्यांपासून जे भोगतोय ते कधी विसरणार नाही”, असा घणाघात ट्विटद्वारे केला आहे.

‘शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर;राजकिय किंमत मोजावी लागणार’

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातील अनेक गावांत १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे, जी पाळणे सर्व चाकरमान्यांना शक्य होऊ शकणार नाही. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने गावी जायचे तर कसे? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तर खासगी वाहने अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत, ई-पाससाठी देखील दलाली चालू असून चाकरमान्यांना आर्थिक बुरदंड बसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!