तुळजापूर – प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवुनही नागरिकांकडून यास अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी मंगळवार दि ३१ रोजी जनता कर्फ्यु पुकारला.
तिर्थक्षेञ तुळजापूर सह तालुक्यात मंगळवारी (दि.३१) रोजी दुसऱ्यांदा पुकारलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार शहरात सर्वञ शुकशुकाट दिसुन आला. येथील मंदीर, बसस्थानक, बाजारपेठ, भाजीमंडई व परिसर तसेच प्रत्येक गल्लीबोळ निर्मनुष्य झाले होते. शासकिय कार्यालायातील वर्दळही बंद होती.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथील शासकीय कार्यालये,दवाखाने वगळता सर्व किराणा दुकाने बंद ठेवण्यात आले होते. दुध विक्रते माञ रस्त्यावर सकाळी होते. ग्रामीण भागातील मंडळीनी जनता कर्फ्यु दिनी शेत गाठणे पंसत केल्याने खेडे ही निर्मनुष्य झाली होती. एकंदरीत दुसरा जनता कर्फ्यु यशस्वी करण्यास प्रशाषणास यश आल्याचे दिसुन आले.
हेही पहा –


