Share

राज्याचे नेतृत्व करण्या इतपत आदित्य ठाकरे सक्षम आहेत : संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर येत्या काळात आदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असा विश्वास शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. याच पार्श्ववभूमीवर शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषेद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून आदित्य ठाकरे यांनी आपली कामं सुरू केली असून त्यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने नेतृत्व करू शकतात. तसेच यावेळी राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याचा कसा असणार आहे याबाबत माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे देखील त्यांच्या बरोबर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढावी अशी अनेक शिवसैनिकांची मागणी आहे. तसेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत आग्रह धरला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे येत्या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष रित्या उतरणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जर आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलेच तर कोणत्या मतदार संघातून लढणार यावर शिवसेनेकडून चाचपणी सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!