मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील उमदा आणि मोस्ट हँडसम मंत्री म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. तरुणाईच्या गळ्यातलं ताईत असलेल्या या मंत्र्याच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. त्यामुळे जागतिक व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने त्यांना प्रश्न विचारल्या नंतर त्यांनीही अशीच भन्नाट उत्तरं देऊन वेळ मारून नेली आहे.
एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ‘आज व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने आपल्यासोबत तरुणींच्या गळ्यातले ताईत आहेत’ असं विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही ताईत बोललात की ताई बोललात, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. तर सकाळपासून मी शाळेची उद्घाटनं करत फिरतोय. इतरही खूप कार्यक्रम आहेत. ‘माझं वर्कआऊट थांबलंय. मंत्रालयातच खूप वरखाली होतं. असहही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक दिवशी मी शिक्षण आरोग्य याविषयावरच काम करतोय. यावेळी पुढच्या प्रश्नाचा रोख ओळखत ते मिश्किलपणे म्हणाले की, ‘मला माहित आहे आता तुमच्या पुढच्या प्रश्नांची दिशा काय असणार आहे’. यावेळी त्यांना ‘पर्यावरण, पर्यटनाच्या कामातून पुढची दिशा मिळणार आहे का?’ असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मी तुमची एकदा भेट करून देणार आहे. अवघड प्रश्न काढू नका, मला महाराष्ट्राचं काम आधी करु द्या, असं ते मिश्किलपणे म्हणाले.
‘निवडणुकीच्या आपण सांगितलं होतं आधी लगीन कोंढाण्याचं, आता निवडणूक संपली आहे’ असं त्यांना विचारले असता आदित्य ठाकरे क्षणभर लाजले. आणि म्हणाले की, घरी हा प्रश्न विचारु नका. मी तुमच्याच मतदारसंघातला आमदार आहे. तुमची भेट करुन देतो. लग्नं वगैरे जमलं तर तुमच्याकडे येऊ शकणार नाही, मला महाराष्ट्राचं काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
