Share

Aditya Thackeray | “वेदांता प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं…”, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | मुंबई : राज्यातील चार मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प गुजरातला गेले. नुकताच हातून गेलेला टाटा एअर बस (Tata Air Bus) प्रकल्पावरुन राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली असून राज्य सरकार वर त्यांनी घणाघात केला आहे.

यादरम्यान, वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प हातून गेला तेव्हाच आम्ही त्यांना टाटा एअर बस प्रकल्पाच्या मागे लागा असं सांगितलं होतं. मात्र, तरी सुद्धा हातातला प्रकल्प गेलाच कसा, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

परतिच्या पावसामुळे मराठवाडा येथील शेतकऱ्यांचे अर्थात राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर देखील सरकार काही करत नाहीये, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, आम्ही अजूनही ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत आहोत. मात्र, घटनाबाह्य सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकलं नसल्याचं देखील ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही जुलै पासून आरडा ओरडा करतोय की टाटा एअर बस प्रकल्प तरी जाऊन देवू नका, तो प्रकल्प पण आज हातून गेला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!