Aditya Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन भाजप पक्षासोबत युती केली आणि राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिवसैनिक राहिले असल्याचं दिसून येतं आहे. सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली असते. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
‘मटा कॅफे’च्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना हे घडलं. एवढी सगळी यंत्रणा असताना काहीतरी चुकलं किंवा गोष्टींचा अंदाज आला नाही, असं काही झाल्यासारखं वाटतं का?. त्यावर आदित्य म्हणाले, गेले एक ते दीड वर्ष कानावर येत होतं की हे गद्दारांचे नेते (एकनाथ शिंदे) हे काहीतरी करण्याच्या मार्गावर आहेत. एवढं मोठं काहीतरी करतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं होतं की राज्यसभा निवडणुकीमध्ये झालं तसं मतवगैरे फुटण्याचा प्रकार होईल.आम्हाला वाटलं होतं की राज्यसभा निवडणुकीमध्ये झालं तसं मतवगैरे फुटण्याचा प्रकार होईल.
20 मे ला त्यांना (एकनाथ शिंदे) ‘वर्षा’वर बोलवलेलं उद्धवसाहेबांनी आणि विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? ही घ्या चावी आणि मुख्यमंत्री व्हा. मला काही मुख्यमंत्री होण्यात आनंद नाही. मला जबाबदारी दिली आहे ती स्वीकारली आहे. लोकांची सेवा करतोय, तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सांगितलं होतं. तेव्हा ते रडले वगैरे. इतर जो काही असतो तो थोडा ड्रामा झाला. तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच आमच्यासाठी देव वगैरे वगैरे झालं. दुसरे मंत्री ज्यांना आता डाऊनग्रेड केलं आहे. त्यांनी तर पोह्यांवर म्हणजे अन्नाची शपथ घेतली होती. काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. गद्दारी करणार नाही. तेही निघून गेले.
ही यंत्रणा वापरायची किती, कशी आणि कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं. या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की नाही ठाऊक नाही. पण नॉर्मली असतं. पण या यंत्रणेचा गैरवापर करायचा का? आधीच्या सरकारमध्ये फोन टॅपिंग वगैरे व्हायचे. ते करायचे म्हणून आम्ही पण करायचं का? किती लक्ष ठेवायचं?असा एक तरी विरोधी पक्षातला किंवा भाजपाचा आमदार, खासदार सांगा ज्याला शिवसेना म्हणून किंवा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार म्हणून अडीच वर्षात आम्ही सतावलेलं आहे. कोणाची तडीपारी काढलीय? कोणाच्या मागे यंत्रणाला लवलीय? कोणी असंही सांगू शकणार नाही की तुम्ही आमच्यावर नजर ठेवली. लोकशाही आहे. सगळ्यांनी सगळ्यांची कामं करावीत. कोणाची कामं अडवलेली नव्हती सगळ्यांची काम नीट सुरु होती, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Pravin Darekar | भास्करचा आता सुर्योदयाऐवजी सूर्यास्त जवळ आला – प्रवीण दरेकर
- Pravin Darekar | “सोंगाड्या, कोणी नाच्या म्हणतं मी तर रानडुक्कर बोललो” ; प्रवीण दरेकरांचा भास्कर जाधवांवर घणाघात
- Viral Video | एक हात असलेल्या ‘या’ माकडाचा आश्चर्यचकित करणारा पाहा व्हिडिओ
- Devendra Fadnavis | “…म्हणून रश्मी शुक्ला यांच्यावर खटला चालू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Chandrashekhar Bawankule | भाजपने कधीही उध्दव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

