टीम महाराष्ट्र देशा : वाडिया रुग्णालयाची देणी मुंबई महापालिकेने थकविल्याने रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक अडचणींमुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना डिस्चार्ज दिला, तसेच पुढील शस्त्रक्रियाही अचानक रद्द केल्या. याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसला आहे. या सगळ्या वादावर मुंबई पालिकेकडून प्रथमच खुलासा आला आहे.
वाडिया रुग्णालयाच्या प्राथमिक चौकशीत कारभारात अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये अतिरिक्त कामगार भरती, दुबार वेतन, मानधन, पालिकेची परवानगी न घेता वाढविण्यात आलेले अतिरिक्त बेड असे प्रकार समोर आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे.
याबाबत निर्णय घेण्यासाठी महापौर, पालिका प्रशासन आणि रूग्णालय प्रशासनामध्ये बैठक होणार आहे. डिया ट्रस्टने आपली बाजू ठेवल्यानंतर पुढील कारवाई बाबत निर्णय होईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वाडिया प्रकरणावर काहीही झालं तरी वाडिया रुग्णालय आम्ही बंद होऊन देणार नाही. तसेच आमचे हात जोडलेले आहेत ते असेच जोडलेले राहू द्या असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. तर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून येणारा निधी थकल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या वाडिया रुग्णालयावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
