पुणे – करोना काळामध्ये देखील अनेक देशांमध्ये निर्बंध अजूनही कायम आहेत. पण काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध उठवले आहेत. अशा देशांमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता संबंधित देशात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यावर क्वारंटाईन केलं जात आहे.
विशेष म्हणजे सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.
सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, परदेशी जाणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, कोविशील्डची लस घेतलेल्यांना काही देशांमध्ये अद्याप थेट प्रवेश मिळत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य आहे. या परिस्थितीत तुम्हाला काही खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी मी 10 कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला गरज असल्यास कृपया अर्ज करा असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कुस्तीपटु बजरंग पुनीयाची उपांत्यपुर्व फेरीत धडक, पदकाची आशा वाढली
- कृणाल पांड्या कोरोनावर मात करून परतला मायदेशी ‘हे’ दोन खेळाडू श्रीलंकेतच
- ‘सत्ता नाही म्हणून असंतोष निर्माण करू नका; हवं तर मराठा आरक्षणाचे श्रेय देखील घ्या पण…’
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

