मुंबई : गेले काही दिवस अभिनेत्री केतकी चितळेला सोशलमिडीयावर ट्रोल केले जात आहे. केवळ हिंदी भाषेत बोलण्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती एका वाहिनीने दिली आहे. आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी देखील केतकीने दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

