Share

कात्रजच्या घाटात भडकलेली आग अभिनेते सयाजी शिंदेंनी विझवली

Published On: 

पुणे : पुण्याजवळील कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना घडली आहे. वणवा विझविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी धाव घेतली. कात्रज घाटातून प्रवास करताना वणवा लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली.

सयाजी शिंदे आणि नगरसेवक राजेश बराटे हे पुणे मार्गे सातारच्या दिशेने निघाले होते. त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कार्यक्रम होता. मात्र कात्रजच्या नवीन बोगद्याच्या जवळून जात असताना त्यांना वर धुराचे लोट दिसले. गाडी थांबवून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा वणवा विझवला.

सयाजी शिंदे यांना दीड तासांनी वणवा विझवण्यात यश आले. त्यासोबत त्यांनी आज होळी आहे, होळीनिमित्त झाडांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहनही अभिनेते सयाजी शिंदे केले.

दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना नव्हती. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात, अग्निशामन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी आगीचा कॉल आला नसल्याचे सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!