Share

अभिनेते सयाजी शिंदे यांना सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Published On: 

मुंबई : कार्पोरेट सामाजिक जबाबदारी क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार   देण्यात येतो. यावर्षी अभिनेते सयाजी शिंदे यांना चित्रपट अभिनय आणि पर्यावरणसंवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड, वनसंवर्धनाचे कार्य सयाजी शिंदे यांनी केले आहे.

हा सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात रविवारी आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मानवतेच्या कल्याणासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सात श्रेणीत सीएसआर जर्नल उत्कृष्टता पुरस्कार देण्यात आले. प्रकाश आमटे, श्रीमती मंदाकिनी आमटे, स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यासहित अनेक व्यक्तींना आणि संस्थाना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!