Share

अभिनेता गोविंदाच्या मुलीचा नवा चित्रपट, एका मोठ्या ब्रेकनंतर… 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदा याची मुलगी टीना अहुजा हीचा बॉलीवूड मधील पहिला सिनेमा ‘सेकंड हैंड हसबँड’ हा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु या सिनेमाला तेवढी पसंती चाहत्यांकडून मिळली नाही. त्यानंतर टीना बॉलीवूड पासून लांब गेली होती. त्या चित्रपटानंतर टिनाने कोणताच चित्रपट केला न्हवता. एवढ्या मोठ्या ब्रेक नंतर टीना पुन्हा एकदा बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे.

टीना आहूजा तिच्या आगामी सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. तिची शॉर्टफिल्म ‘ड्रायव्हिंग मी क्रेझी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही शॉर्टफिल्म ऑनलाइन डेटिंगवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. टिनाचा या शॉर्ट फिल्म मधील लुक चाहत्यांना फार आवडला आहे. या शॉर्ट फिल्मसाठी टिनाने बरीच मेहनत घेतली आहे. टिना या वेळी तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करेल का? हे पाहण्याजोगे ठरेल.

अभिनेत्री रवीना टंडन हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टीनाचा हा नवा सिनेमा प्रमोट केला आहे. तिने ट्विट करत लिहिले की, ‘एक मस्त शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. माझी मैत्रीण पूर्णिमा लामछानेने ही शॉर्टफिल्म डिरेक्ट केली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये टीना आहुजासोबत मुदित नायर दिसणार आहे. दोघांची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडू शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!