मुंबई : सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच अंकुश चौधरी छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिएलिटी शोमध्ये तो परीक्षकच्या भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धक त्यांचे सुपर डान्स याठिकाणी सादर करणार आहे. त्यामुळे स्पर्धा फारच कठीण असण्याची शक्यता आहे. या सुपर डान्समधून काही मोजक्या जणाची निवड अंकुशला करायची आहे. या शोचा व्हिडिओ देखील अंकुशने त्याच्या इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CR8nQdhFwii/?utm_source=ig_web_copy_link
याबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, ‘तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज होताना खूप आनंद होत आहे. मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जाणार आहे, तसेच परिक्षकाची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडत आहे. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे.’ असे म्हणत त्याने या कार्यक्रमाविषयी असलेली उत्सुकता व्यक्त केली आहे.
अंकुश चौधरीने दुनियादारी, डबल सीट, क्लासमेट, गुरु, ट्रिपल सीट, दगडी चाळ आणि ती सध्या काय करते?, यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या उत्तम अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. आता छोट्या पडद्यावर त्याला परीक्षक म्हणून पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’
- गणपतराव आबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, समर्थकांना अश्रू अनावर
- नेम चुकला : पत्नी दिपीकानंतर पती अतनु दास ऑलिम्पिकमधून बाहेर
- असा राजकारणी पुन्हा होणे नाही, यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले दुःख
- महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

